विठु माझा चोरटा...
विटेवर उभा राही
लोणी लाडुपेडे पाही
भक्तांना त्रास देई
तरी त्यांसच बिलगुन राही
काळा विठु गोबऱ्या
गोबऱ्या गालाचा चोर
तुळशी-फुले धारण करी
चंदन वंदन अर्जित होई
भक्त सतत भेटण्यास येई तरी
मन त्याचे आसुसितच राही
काळा विठु गोबऱ्या
गोबऱ्या गालाचा चोर
भर रात्री वेणु वादन करी
गोपी धावून भेटण्यास येई
त्यांना धर्माचा उपदेश देई
मग त्यांचे सारे धन लुटू पाही
असा विठु गोबऱ्या
गोबऱ्या गालाचा चोर
गाई वासरं संभाळी
गोवर्धन धारण करी
मोठ्याश्या हृदयात साऱ्या
भक्तांना दडवून ठेवी
काळा विठु गोबऱ्या
गोबऱ्या गालाचा चोर
Comments
Post a Comment